उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील : चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीने आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेतली आहे. त्यावेळी माध्यमांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी याना बदनाम करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. उद्या निवडणूक घ्या, मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकतील असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी बैठकीला भाजप खासदार नारायण राणे, प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, विनायक मेटे हे उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत पण यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला आहे. आरक्षणाच्या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले आहे की, कायदा अयोग्य असता तर नोकऱ्या आणि प्रवेश कोर्टाने कसे दिले असते?

भाजप पण मराठा समजला आरक्षण देण्यासंदर्भात पाठींबा देणार आहे. भाजपने पाठींबा दिल्यांनतरही सरकारला मागासवर्गीय आयोग नेमावा लागणार आहे. ह्या आयोगाला सिद्ध करावे लागेल की मराठी समाज मागास आहे.

आरक्षणासंदर्भात स्पष्टीकरण देतांना त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. आताच लॉकडाऊन पुढे वाढविण्याची भाषा हे सरकार करत आहे. भाजप मराठा समाजाला पाठींबा देईल.

मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा समाज रस्त्यावर उतरेल म्हणून लॉकडाऊन केले जात आहे. मराठा आंदोलन सरकारला झेपणार नाही असा आरोप पण यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने भक्कम बाजू न मांडल्याने आरक्षण रद्द झाल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
‘द कपिल शर्मा शो’ मधील ही अभिनेत्री आहे बेरोजगार; लढतेय मोठ्या आजाराशी

प्रेक्षकाच्या त्या घाणेरड्या कृत्यामुळे गायिकेने लाईव्ह शोमध्ये प्रेक्षकाला धुतलं; व्हिडिओ व्हायरल

‘सुपर डान्सर ४’ मधील संचितच्या डान्सने रेमो डिसुजा यांची बोलती बंद; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.