गलवान घाटीत जखमी झालेल्या जवानांना भेटले पंतप्रधान मोदी; जवानांच्या साहसाचे केले कौतुक

 

नवी दिल्ली | गलवान घाटीमध्ये जखमी झालेल्या जवानांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. जवानांना भेटण्यासाठी मोदी जवानांवर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयात पोहोचले.

यावेळी त्यांनी जवानांसोबत बोलून त्यांचे मनोधैर्य वाढविले. जवानांनी सीमेवर चीनी सैन्याला दिलेले प्रत्युत्तर देशातील अनेक पिढ्यांना कायम प्रेरित करेल असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

जवानांशी बोलताना मोदी म्हणाले, तुम्ही दाखवलेले शौर्य जगासाठी एक संदेश आहे. संपूर्ण जग तुम्ही दाखवलेल्या शौर्याचे कौतुक करत आहे.

कोणत्याही स्थितीत आज पर्यंत देश कोणासमोर झुकला नाही आणि इथून पुढे जगातील कोणताही मोठ्या शक्ती समोर देश झुकणार नसल्याचे मोदींनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.