कोरोनामध्ये नोकरी गेलेल्यांना मोदी सरकार देणार तीन महिने अर्धा पगार; तेही घरबसल्या

 

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केले गेले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे बंद पडले आहे. तसेच काही कंपन्या बंद झाल्याने लाखो कामगार बेरोजगार झाले आहे.

आता कोरोनाच्या संकट काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. या कामगारांना तीन महिने पगाराच्या ५० टक्के रक्कम बेरोजगारी भत्ता किंवा ‘अनएम्पलॉयमेंट बेनिफिट’च्या स्वरुपात दिली जाणार आहे.

तसेच केंद्र सरकारकडून बेरोजगार भत्त्यासाठी  पात्रता निकष शिथिल करण्यात येणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

२४ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत नोकरी गमावलेल्या किंवा गमावणाऱ्या सुमारे ४१ लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होईल, असा अंदाज ईएसआयसीने व्यक्त केला आहे.

तसेच ही सुविधा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांना मिळणार आहे, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.