‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगीही मोदी सरकारने द्यावी, वऱ्हाडींचा खर्चही उचलावा’

मुंबई। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या विषयांवरून वाद सुरू आहेत. प्रत्येक मुद्द्यावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असतात. अशातच कोविड संकटानंतर राज्यात प्रत्येक मुद्यावरून राजकीय वर्तुळात वाद होत आहेत.

अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे सुपुत्र हे राज्य सरकारवर कायम कोणत्या ना कोणत्या विषयावरून डिवचत असून एकमेकांवर टीका केली जात आहे. अशातच रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर नक्षलवादी कारवाया आणि नक्षलवादी क्षेत्राचा विकास यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला गेले होते.

व यावेळी उद्धव ठाकरे यांनी बैठकीत यावेळी नक्षलग्रस्त भागांमध्ये विकासकामांसाठी केंद्राने अधिक निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी नक्षलग्रस्त भागातील विकासासाठी १२०० कोटी रुपयांची मागणी केली. विकासकामे, नवीन पोलिस पोस्ट, नवीन शाळा आणि मोबाइल टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

व यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यानवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागण्याची सवय झाली आहे. आदित्यला लग्नासाठी स्थळही केंद्राने द्यावे असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. व यासंदर्भात त्यांनी एक ट्विटदेखील केलं आहे.

या ट्विटमध्ये आपण पाहू शकतो की, नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागण्याची सवय झाली आहे. आदित्यला लग्नासाठी स्थळ पाहिजे ते केंद्रांनी द्यावे, लागणारा खर्च पण द्यावा, जेवणाची जबाबदारी संबंधित विभागाकडे द्यावी, आमच्या कार्ट्याला कोणी समोरून देणार नाही.

पुढे ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात स्टेजवर उभे राहून फक्त दात दाखवायचं काम करू या शब्दांत ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

याआधीही काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. ‘प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची सवय या सरकारला झाली आहे.

उद्या आदित्य ठाकरे यांच्या लग्नासाठी मुलगी बघायची झाली तर त्यासाठी देखील महाविकास आघाडीचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवेल. तुमच्या पाहण्यात कुणी असेल तर सांगा असं म्हणतील,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
भयानक दृश्य! साताऱ्यात अल्पवयीन मुलीचे स्मशानभूमीत पूजन; मांत्रिकाने मांडीवर कोंबडा ठेवला अन्…
अमृताशी घटस्फोट घेऊन, करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण… सैफ अली खानने केला मोठा खुलासा 
सिंधू नदी पुन्हा भारताचा भाग बनेल, अरबी समुद्राला सिंधूसागर हेच नाव योग्य- भगतसिंग कोश्यारी 
चालू किर्तनातच मुस्लिम किर्तनकार ताजूद्दीन महाराजांनी सोडला प्राण; पहा ह्रदय हेलावनारा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.