मोदी सरकार आणखी दोन बॅंका विकण्याच्या तयारीत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती दिली. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. कोरोनामुळे देशाची विस्कटलेली घडी पाहता आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दोन सरकारी बँका विकणार असण्याची घोषणा केली आहे. तसेच दोन सरकारी बँका आणि एका विमा कंपन्याचं खासगीकरण केलं जाणार आहे आणि केंद्र सरकार छोट्या बँकांना मोठ्या बँकेत वर्ग करणार असल्याचं सितारमण यांनी सांगितलं आहे.

काही दिवसां पासूनच केंद्र सरकारकडून कंपन्या आणि बँकांचं खासगीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला होता. अर्थमंत्र्यांनी आज लोकसभेत स्पष्ट करून टाकले आहे. निधी जमा करण्यासाठी सरकारी कंपन्यांच्या जमिनीही विकल्या जाणार असल्याची घोषणा सितारमण यांनी केली आहे.

अर्थसंकल्पात बँकांना उभारी देण्यासाठी २० हजार कोटी रूपयांची घोषणा केली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला चालना मिळणार आहे. दरम्यान केंद्र सरकारकडून सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करण्यात येणार असल्याने त्यांच्या टिका करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीत? पालिकेवर दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ
खुशखबर! वाहनाच्या नव्या पॉलिसीमुळे वाहननिर्मितीला मिळणार चालना
‘गरिबाला आणखी गरीब करु नका, महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्या’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.