मोदी सरकारने ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा प्लॅन केला- प्रकाश आंबेडकर

अकोला | केंद्र सरकारच्या एका चुकीच्या आरक्षण धोरणामुळे २०१७ पासून इतर मागासवर्गाचे ११ हजार विद्याार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत.

मोदी सरकारने नीटला हाताशी घेऊन कट ऑफ मध्ये बदल घडवून, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा बरोबर प्लॅन केला आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. नीटद्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही.

ओबीसी विद्यार्थ्यांना डावलून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाले. ओबीसी हिंदू आहेत आणि केंद्रात ओबीसींचे सरकार, तर राज्यात काँग्रेस व हिंदुत्ववादी शिवसेनेची सत्ता आहे.

तरीही ओबीसींवर हिंदूकडूनच अत्याचार होत आहे. हे मोदी सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणं आवश्यक आहे. मात्र मोदी सरकारने ते आरक्षण दिले नाही, त्यामुळे सरकारने याबाबत निर्णय मागे घ्यावा.

नाहीतर वंचित आघाडीच्या झेंड्याखाली ओबीसीचे विद्यार्थी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.