मोदी सरकारच्या या योजनेमुळे एप्रिलपासून तुमचा पगार कमी होण्याची शक्यता

मोदी सरकार लवकरच नवीन निर्णय घेऊ शकते ज्यामुळे थेट तुमच्या पगारावर परिणाम होऊ शकतो. एप्रिल २०२१ पासून new compensation rule लागू होऊ शकतो. ज्यानंतर तुमची टेक होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो.

पगारासंबंधित नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार आहेत आणि तुमच्या हातात कमी पगार पडू शकतो. केंद्र सरकारच्या न्यू वेज कोड अंतर्गत कंपन्या पे पॅकेज रिस्ट्रक्चर करू शकतात.

त्यामुळे एप्रिलपासून कर्मचाऱ्यांचा पगार, पीएफ आणि ग्रॅच्युटीच्या नियमात बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकार लवकरच हा रूल राबविण्याचा विचार करत आहे. ज्यामुळे कंपनीच्या बॅलेन्सशिटमध्ये बदल होणार आहे.

हे नियम २०१९ च्या संसदेत पारित केलेल्या वेज कोडचा एक भाग आहेत. त्यामुळे पगाराची पुर्ण प्रक्रिया बदलणार आहे. या नवीन नियमात अलाउन्सची मर्यादा निश्चित असणार आहे. हा एकून पगारापेक्षा ५० टक्क्यांनी कमी असणार आहे.

त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. हे विधेयक संसदेत पारित करण्यात आले होते. त्याआधी पब्लिक फिडबॅक मिळाल्यानंतर केंद्र सरकार याबाबत सुचना देईल. याचा खाजगी क्षेत्रावर विशेष परिणाम होणार आहे.

ग्रॅच्यूइटीची आणि पीएफची रक्कम वाढणार आहे. या नियमामुळे असा फायदा होणार आहे की जरी तुम्हाला पगार कमी मिळणार असला तरी तुमच्या रिटायरमेंट फंडात वाढ होणार आहे. तसेच कंपनीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतारवयात इतकी बेइज्जती होऊ नये
राष्ट्रवादीने फडणवीसांनाच घेरले; जप्त केलेली ती गाडी फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीची
डाव पुन्हा पलटला! जप्त केलेली ‘ती’ गाडी फडणवीसांच्या ‘गुडबुक्स’मधल्या बिल्डरची
‘राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण एक महिला किंवा पोलीसवाला त्यांची वाट लाऊन जातात’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.