मोदी सरकार बाजारभावापेक्षा कमी दरात देताय सोनं, जाणून घ्या काय आहे ही योजना

जर तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे. यामध्ये तुमचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. ज्यामध्ये तुम्ही सोनू खरेदी करून गुंतवणूक देखील करू शकता.

या योजनेचा पहिला टप्पा १७ मे पासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोनं खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात.

या योजनेचा हेतू म्हणजे सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे, जेणेकरून सोन्याची आयात कमी होईल. सॉवरेन गोल्ड बॉन्डचा कालावधी आठ वर्षांचा असेल, यात पाच वर्षांनंतर बॉन्ड काढण्याचाही पर्याय आहे. यात 1 ग्रॅम सोन्याच्या खरेदीपासून गुंतवणूक करता येते.

या सोन्याच्या शुद्धतेबाबत फसवणूक होण्याची देखील शक्यता नसते. गेल्या सहा वर्षंपासून ही योजना सुरू आहे म्हणजेच २०१५ साली या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेअंतर्गत वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार ग्रॅम सोन्यासाठी गुंतवणूक करू शकता.

ट्रस्ट आणि यासारख्या दुसऱ्या कंपनी दरवर्षी 20 किलो गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता. जर सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर याची खरेदी मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज सारख्या NSE, BSE मधून करता येईल. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करता येऊ शकते.

यामुळे आता तुम्हाला १७ मे पासून पाच दिवस बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. केंद्र सरकारची ही योजना आहे.

ताज्या बातम्या

तिनं आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं, तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही; आनंद महिंद्राही झाले भावूक

सचिन तेंडूलकरला टाकली एक ओव्हर अन् त्या बॉलरचे अख्खे करियर झाले उध्वस्त; पहा व्हिडिओ

Video; चिडलेल्या हत्तीने केळीची संपूर्ण बाग उध्वस्त केली, मात्र एक झाड सोडले, कारण ऐकल्यावर अवाक व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.