काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम

तुम्हाला घरी बसल्या बसल्या मोठी रक्कम कमवायची आहे? जर असे बोलले की मोदी सरकार तुम्हाला घर बसल्या काही गुंतवणूक न करता तुम्हाला ५०,००० रुपये देईल तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र असे घडत असून या संधीच सोन करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर आहे.

तुम्हाला काही एक करायचे नाहीये, फक्त मोदी सरकारकडून एक स्पर्धा घेण्यात येणार आहे त्यात भाग घ्यायचा आहे, जिंकणाऱ्या ३ स्पर्धकांना रोख रक्कम मिळणारं आहे. प्रथम पारितोषिक ५०,००० द्वितीय पारितोषिक २५,००० आणि तृतीय पारितोषिक १०,००० इतके आहे.

“My Gov India” च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरती या सर्वाची माहिती देण्यात आली आहे. पण ही स्पर्धा नेमकी आहे कशा संधर्भात? संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने भारताने पुरस्कृत केलेला एक ठराव एकमताने पारित केला आहे. या ठरावा अंतर्गत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

तब्बल ७० पेक्षा अधिक देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यानुसार भारत सरकार आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष २०२३ ला एक योग्य लोगो आणि घोषणा/टॅगलाइन जारी करेल. ही स्पर्धा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आयोजित करणार असून नागरिकांना एक आकर्षक आणि उद्देश पूर्ण लोगो आणि टॅगलाईन बनवायची आहे. या स्पर्धेद्वारे नागरिक आपली कला आणि विचारक्षमतेचे चांगले प्रदर्शन करू शकता.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला myGov.in या पोर्टलवर जावे लागेल. तिथे तुम्हाला लॉग इन टू पार्टिसिपेट (log in to participate) हा ऑप्शन दिसेल. पुढे दिलेल्या सूचनेनसार तुम्हाला माहिती भरावी लागेल. https://www.mygov.in/task/logo-and-slogantagline-contest-international-year-millets-2023/ या लिंकचा वापर करून तुम्ही स्पर्धेत भाग घेऊन शकता.

 

महत्वाच्या बातम्या
साकीनाका बलात्काराचा तपास करण्यासाठी जोत्सना रासम यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे जोत्सना रासम
शिवसेनेची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढणार
अक्षय कुमारने वाढदिवसाच्या दिवशी आईसोबत फोटो शेअर करून लिहिले असे काही वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.