आता तरुणांना नोकरीसाठी दारोदारी फिरावं लागणार नाही; मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | तरुणांच्या नोकरींबाबत मोदी सरकारने बुधवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरी परिक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून एक राष्ट्रीय भरती संस्था तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परिक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येऊल, या उद्देशाने ही निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी तरुण अनेक मार्गांचा अवलंब करतात. प्रत्येक संस्था किंवा कंपन्या आपापल्या परिक्षा ठेवतात. तरुण त्या परिक्षाही देतात. मात्र आता मोदी सरकराने घेतलेल्या निर्णयामुळे घेतलेल्या हे चित्र आता पालटण्याची शकता आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतली असल्याची माहिती दिली आहे.

आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी परिक्षा देण्यास तयार असणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांना सामायिक परिक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती योजना तयार करण्यात येईल. या संस्थेत उमेदवाराने एकदा नोंदणी केली की एकच परिक्षा देऊन  आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतो. त्यामुळे तरुणांना नोकरीसाठी दारोदारी फिरण्याची वेळ येणार नाही.

युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल, असं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.