Share

Modi Government : रद्दी विकून मोदी सरकारने कमावले ‘एवढे’ कोटी रुपये; आकडा वाचून धक्का बसेल

Narendra Modi

Modi Government : मोदी सरकारने २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू केले होते. त्याअंतर्गत आता सरकारने आपल्या मंत्रालयांच्या विभागांमध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली आहे. गेल्या तीन आठवड्यांत केंद्र सरकारच्या सरकारी कार्यालयातून रद्दी, फाइल्स, आणि फर्निचरची विक्री करण्यात आली आहे.

यातून सरकारने सुमारे २५४ कोटी रुपये कमावले आहेत. एवढेच नाही तर रद्दी विकल्यानंतर सेंट्रल व्हिस्टाएवढी म्हणजे सुमारे ३७ लाख स्क्वेअर फूट जागाही रिकामी झाली आहे. या रिकाम्या जागेत इंडिया पोस्ट ऑफिसने कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन आणि एक भव्य गॅलरीही बांधली आहे.

२ ऑक्टोबरपासून सुरू झालेली स्वच्छता मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. इंडिया पोस्टचे हे कँटीन दिल्लीमध्ये आहे. त्याचे नाव अंगण असे ठेवण्यात आले आहे. याठिकाणी आधी कचऱ्याचे ढिगारे होते. यामध्ये फाईल्स, रद्दी, तुटलेले फर्निचर, खराब झालेले एसी, कुलर आणि कंप्यूटर होते.

परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातून शिकवण घेत ही सर्व रद्दी आणि अनावश्यक वस्तू विकून त्यातून लाखो रुपयांची कमाई झाली आहे. आता याठिकाणी एक सुंदर कॅन्टीन आणि भव्य गॅलरी बनवण्यात आली आहे. अशाच प्रकारे केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे.

वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबवली आणि तेथील रद्दी आणि कचरा विकून २५४ कोटी रुपये कमावले आहेत. सुमारे १८ हजार भारतीय पोस्ट, ७ हजार रेल्वे स्थानके, ६ हजार औषध निर्माण विभाग, ४५०० डिफेन्स आणि सुमारे ४९०० गृह मंत्रालयाच्या ठिकाणी फाइल्स आणि जंक संदर्भात ही मोहीम राबवण्यात आली आहे.

तीन आठवड्यात रद्दीच्या विक्रीतून सुमारे २५४ कोटी रुपये कमावले आहेत. तसेच जवळपास ३७ लाख चौरस फूट क्षेत्रफळ रिकामे करण्यात आले आहे. हे क्षेत्र सेंट्रल व्हिस्टा क्षेत्राच्या बरोबरीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या
Bachchu Kadu : रवी राणा हे फडणवीस आणि शाहांच्या जवळचे, त्यामुळे…; बच्चू कडू यांचे धक्कादायक वक्तव्य
gulabrao patil : शिंदे गटात बंडाची ठिणगी! मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात ‘या’ आमदाराने फुंकले रणशिंग
bjp : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक बंड?, भाजप नेत्याच्या खळबळजनक दाव्याने उडाली खळबळ
abdul sattar : डोक्यात सत्तेची हवा..! “तुम्ही दारू पिता का?” पीक पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री अब्दुल सत्तारांचा प्रश्न?

ताज्या बातम्या इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now