मोदींनी केली मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार १० लाख रुपये आणि मोफत शिक्षण

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाची लागण झाल्याने अनेक रुग्णांनी प्राण गमावले आहेत.

कोरोनामुळे अनेकांनी आईवडिल गमावले आहेत. या क्रूर कोरोनाने मुलांना अनाथ केले आहे. या मुलांसमोर जगण्याचं मोठं संकटं उभं राहिलं आहे. या मुलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कोरोनामुळे आईवडिल गमावलेल्या मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत महिन्याला ठरावीक पैसे मिळणार आहेत.

तसेच वयाच्या २३ व्या वर्षानंतर १० लाख रुपये या फंडाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. या  मुलांचा १८ वर्षांपर्यंत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५ लाखांचा आरोग्य विमा काढण्यात येणार आहे. याचा हप्ता पीएम केअर भरणार आहे.

या मुलांना मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्यााठी मदत केली जाणार आहे. या कर्जाचं व्याज पीएम केअर फंडामधून भरण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मुलं देशाचं भविष्य आहेत. या मुलांच्या मदतीसाठी आम्ही सर्वकाही करायला तयार आहोत. मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी काम करणे हे आमचं कर्तव्यचं आहे.

महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे भर स्टेशनवर बायकोने दांडक्याने नवऱ्याला चोपले, वाचा नेमके काय घडले
मोठी बातमी! आयपीएल पुन्हा होणार, वर्ल्डकपबाबत लवकर निर्णय, बीसीसीआयची मोठी घोषणा
‘रंग माझा वेगळा’ मधील दीपा उर्फ रेश्मा शिंदे खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस; फोटो पाहून विश्वास बसनार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.