मोदी सरकार BSNL आणि MTNL ची करोडोंची संपत्ती विकणार; जाणून घ्या नेमकी किंमत..

केंद्र सरकार सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने नुकतीच एअर इंडिया कर्जामुळे रतन टाटा यांना विकली आहे. अशात केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार BSNL आणि MTNL ची संपत्ती विकणार आहे.

केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांच्या एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या स्थावर मालमत्तेची सुमारे ९७० कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर विक्रीसाठी यादी केली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाली आहे. BSNL च्या मालमत्ता हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे आहेत आणि विक्रीसाठी त्यांची आरक्षित किंमत ६६० कोटी रुपये आहे.

वसारी हिल, गोरेगाव, मुंबई येथे असलेल्या MTNL मालमत्ता DIPAM वेबसाइटवर सुमारे ३१० कोटी रुपयांच्या राखीव किमतीत विक्रीसाठी सूचीबद्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे, ओशिवरा येथे MTNL चे २० फ्लॅट देखील कंपनीच्या मालमत्ता कमाई योजनेचा भाग म्हणून विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

त्यांची राखीव किंमत ५२.२६ लाख ते १.५९ कोटी रुपये आहे. फ्लॅटमध्ये १ रूम सेटसह २ युनिट्स, १ बीएचकेचे १७ युनिट आणि २ बीएचकेचे १ युनिट आहेत. MTNL मालमत्तेचा ई-लिलाव १४ डिसेंबर रोजी होणार आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार म्हणाले, की MTNL आणि BSNL मधील मालमत्ता विकण्याचा हा पहिला टप्पा आहे. BSNL च्या ६६० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी आणि MTNL च्या ३१० कोटी रुपयांच्या मालमत्तेसाठी बोली लावण्यात येणार आहे. दीड महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे.

मालमत्ता विकणे हा MTNL आणि BSNL च्या ६९ हजार कोटींच्या पुनरुज्जीवन योजनेचा एक भाग आहे ज्याला सरकारने ऑक्टोबर २०१९ मध्ये मान्यता दिली होती. या दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या २०२२ पर्यंत ३७,५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
विधान परिषदेचं तिकीट कापल्यामुळे पंकजा मुंडेंनी सर्वांसमोर व्यक्त केली मनातील खदखद; म्हणाल्या…
जेव्हा भारताचे पंतप्रधान नवाझ शरीफांना म्हणाले होते तुम्हाला कश्मीर देतो पण ‘या’ अटीवर; वाचा किस्सा
पराभवाच्या भितीने भाजपने पळ काढला, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.