Aditya Thackeray : शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भारतीय क्रीडा मंत्रालयावर (Sports Ministry) जोरदार निशाणा साधला आहे. यंदा पुरुष हॉकी आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या (Pakistan) हॉकी संघाला भारतात सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारची तीव्र शब्दांत निषेध केला.
पहलगाम हल्ला
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 23 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यापाठोपाठ भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. मात्र, अद्यापही हल्लेखोर पकडले गेलेले नाहीत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) जारी केलेले संशयिताचे स्केचदेखील नंतर चुकीचे असल्याचे सांगण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित प्रश्न असा – ‘‘देशाने एवढं सगळं विसरलं का? आणि इतक्या लवकर पाकिस्तानच्या संघाला परवानगी देणे योग्य आहे का?’’
भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीका
आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला करताना म्हटलं की, ‘‘भाजपला वाटत असेल की पहलगाम प्रकरणावर राजकारण करुन मते मिळवता येतील, तर हे फारच लाजीरवाणं आहे. तुम्ही ‘मतासाठी राष्ट्रभक्तीचा वापर’ करत आहात.’’
जय शाह यांचा उल्लेख, क्रिकेटवरुन सवाल
हॉकीनंतर क्रिकेटवरही टीकेची धग वाढवत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘जय शाह (Jay Shah) हे आयसीसी (ICC) चे अध्यक्ष आहेत. तसेच, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे पुत्र आहेत. जर बीसीसीआय (BCCI) म्हणत असेल की पाकिस्तानसोबत आम्ही क्रिकेट खेळणार नाही, तर मग त्याच सरकारच्या एका संस्थेने पाकिस्तानच्या हॉकी संघाला परवानगी कशी दिली?’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सरकारने स्पष्ट उत्तर द्यावं – एकीकडे शत्रू राष्ट्राशी सामना नको, दुसरीकडे स्पर्धेसाठी त्यांनाच निमंत्रण कसे? ही दुहेरी भूमिका कशासाठी?’’
शिवसेनेचा जुना पवित्रा आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नेहमी पाकिस्तानच्या कलाकार, खेळाडू किंवा गायकांच्या भारतातील प्रवेशाला विरोध केला होता. त्यांचा वारसा पुढे नेत आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त केला.