मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार

पेट्रोलच्या किमतींबाबत बोलायचे झाले तर काही दिवसात पेट्रोल सोनाराच्या दुकानातून ग्रामच्या भावात विकत घ्यावे लागेल की काय अशी परिस्थिती झाली आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडली असून हा सांख्यिकीय फुगवटा अजून किती वाढणार आहे याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागून आहे.

मात्र आत्ता केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या विचारात असून असे झाल्यास इंधन दरवाढीला अखेर लगाम बसू शकते. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लखनऊ येथे ४५ व्या जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.

बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सिंगल नॅशनल रेट सह पेट्रोलियम उत्पादनावर टॅक्स लावावा म्हणजेच थोडक्यात म्हणायचे झाले तर इंधन हा विषय GST च्या कक्षेत येण्याबद्दलचा हा प्रस्ताव असून असे झाल्यास पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमधून सर्वसामान्यांना सुटका मिळू शकते.

मात्र GST मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी एकूण पॅनलच्या तीन चतुर्थांश मतांची गरज असते. मात्र सदर प्रस्तावामुळे इंधनाच्या माध्यमातून मिळणारा कर केंद्राच्या कक्षेत जाण्याची संभावना असून राज्याला इंधनाच्या कर आकारणीमुळे मिळणाऱ्या महसुलावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे राज्यांच्या प्रतिनिधींचा या प्रस्तावाला नकार असू शकतो.

पेट्रोलियम उत्पादन GST च्या कक्षेत आणलं गेले तर केंद्र आणि राज्याच्या महसूलात जीडीपी केवळ ०.४ टक्के म्हणजे १ लाख कोटी रुपये कमी होतील. जर पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणलं गेले तर देशभरात पेट्रोल ७५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ६८ रुपये प्रति लीटर या दराने विक्री केले जातील. अश्या प्रकारचे वक्तव्य SBI च्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटने त्यांच्या रिपोर्टमध्ये केले होते.

सध्याला तरी इंधन दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या सर्व सामान्य माणसाच्या जखमेवर मोदी सरकार इंधन दरवाढीला आळा घालून फुंकर मारत अच्छे दिन देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

महत्वाच्या बातम्या
कुत्र्यांना खाऊ घालत होते चिमुकले, अचानक इमारत कोसळली अन् आईसमोरच गेला दोन्ही मुलांचा जीव
अरे वाह! कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या
१२ वी नंतर नाही द्यावी लागणार NEET परीक्षा; १२ वीच्या गुणांच्या आधारे मेडीकलला प्रवेश मिळणार
गणपती विसर्जनावेळी चुकून साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचेही विसर्जन, पुढे काय झालं पहा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.