शेतकऱ्यांसाठी मोदींनी मोठं मनं केलं, एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे करणार का? भाजपचा सवाल

मुंबई । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मोठा निर्णय घेतला. नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावरून मोदींचे कौतुक केले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरे काही तोडगा काढणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन मोठं करून कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री मन मोठं कधी करणार, त्यांच्या प्रश्नावर तोडगा कधी काढणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात एसटी सेवा ठप्प झाली आहे. अनेकांचे यामुळे हाल होत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर ठाकरे सरकार काय तोडगा काढतील याकडे असणार आहे. मुंबईत आझाद मैदानात हे आंदोलन सध्या सुरू असून भाजप नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.

यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे, हे प्रकरण कोर्टात गेले आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.

मुंबईतील आंदोलनात भाजप नेते प्रवीण दरेकर गोपीचंद पडळकर, तसेच सदाभाऊ खोत उपस्थित आहेत. त्याच ठिकाणी ते मुक्काम करत आहेत. यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ते तेथेच बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.