पुणे । मराठा आरक्षणावरून राज्यात आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. यामध्ये ते कोरोना लसीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता मात्र त्यांच्या दौऱ्यावर अडचण निर्माण झाली आहे. पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अडविण्यात येणार असल्याचा एल्गार करण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्व्यक आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली आहे. आबासाहेब पाटील म्हटले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अनेक ठिकाणी मराठा समाजाला डावलले जात आहे. यासाठी मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार आहोत असे पाटील यांनी सांगितले. यामुळे आता ही भेट होणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदींबरोबर अनेक प्रमुख पाहुणे देखील उपस्थित राहणार आहेत.
मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज झाला आहे. यामुळे यामध्ये नरेंद्र मोदींनी लक्ष देण्याची विनंती केली जात आहे. मराठा समाज अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र आरक्षणाचा ठोस असा निर्णय घेतला जात नाही.