मोदी TV वर येऊन रडतील, खासदाराने केलेली भविष्यवाणी अखेर खरी ठरली, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांना रडू कोसळले. ते देशातील कोरोना परिस्थितीवर बोलत होते. याचवेळेस कोरोनामुळे आपल्या जवळच्या अनेक प्रिय व्यक्तींना प्राण गमावावा लागला आहे.

कोरोनामुळे मरण पवालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदींच्या डोळ्यात पाणी आले. आता आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी आपण नरेंद्र मोदींबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे.

सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असे सांगितले होते. काल नरेंद्र मोदी यांना रडू आल्याने चर्चेचा विषय ठरला. यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीमध्ये संजय यांनी, अजून थोडा दिवस वाट पाहा. ते तुमच्यासमोर येतील. ते लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावूक झाले आणि रडू लागले यासंदर्भातील बातम्या चालवतील, असे म्हटले होते.

त्यांनी या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, जे १७ एप्रिलला बोललो होतो ते २१ मे ला खरे ठरले. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाचा व्यक्ती हवाय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला.

ते आता रडण्याचे नाटक करत आहेत, असा टोला संजय यांनी लगवाला आहे. यामुळे आता त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून नरेंद्र मोदींवर सतत टीका केली जाते.

ताज्या बातम्या

WHO चे खळबळजनक विधान! सरकारी आकड्यापेक्षा कोरोना रुग्णांच्या मृत्युंची खरी आकडेवारी फार मोठी

मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रणावतच्या बॉडीगार्डविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या मृत गर्लफ्रेंडचे फोटो तुफान व्हायरल, पहा फोटो…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.