नरेंद्र मोदींनी आकाशातून टिपला भारत इंग्लंड सामन्याचा क्षण, पाहा फोटो

चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना सुरू आहे. आज भारत इंग्लंडमध्ये सामना सूरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानातून या स्टेडियमचा फोटो काढत ट्विटरवर शेअर केला आहे

आज नरेंद्र मोदी चेन्नई मध्ये आले होते. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. भारत इंग्लंडमध्ये सामना सुरू असताना मोदींचे विमान स्टेडियमजवळून जात असताना त्यांनी एक नयनरम्य फोटो काढत त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत कॅप्शन दिलं आहे.

कॅप्शन मध्ये त्यांनी लिहलं की, चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यातील एक क्षण. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नदी, चेन्नई शहरातील मेट्रो, झाडे, स्टेडियम असं दृश्य दिसत आहे.

नरेंद्र मोदींनी फोटो शेअर करताचं अनेकांनी त्याला लाईक्स केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी ट्विटर फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त करत असतात.

महत्वाच्या बातम्या-
IND Vs ENG : विराटलाही त्याने केलेल्या ‘त्या’ नव्या विक्रमावर विश्वास बसला नाही; पहा व्हिडीओ  
नवरा सोडून त्याच्या मित्रासोबतच वेड्यासारखी नाचली ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पहा व्हिडीओ
‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.