नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन करून तब्येतीची विचारपूस केल्याने राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पित्ताशयाचा आणि पोटदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर अनेक पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली.

अनेकांनी अनेक माध्यमांतून त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. त्यामध्ये अनेक विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश आहे. अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

त्यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी नरेंद्र मोदींनी आपल्या तब्येतीची विचारपूस केली असं ट्वीट स्वता शरद पवारांनी केले आहे. पण कालपर्यंत महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना अचानक शरद पवारांची इतकी काळजी का वाटू लागली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपुर्वीच अमित शहा-शरद पवारांच्या भेटीच्या चर्चांना उधान आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या जवळीची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. पण शरद पवारांनी या भेटीवर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

विशेष म्हणजे शरद पवार त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या नेत्यांचे आभार मानत आहेत. अमित शहांना या भेटीबद्दल विचारल्यानंतर त्यांनीही असे सांगितले की अशा गोष्टी उघड करायच्या नसतात. आणि आता नरेंद्र मोदींनी थेट फोन करून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.

महत्वाच्या बातम्या
अजितदादांचे कट्टर राजकीय शत्रू हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला गेले पार्थ पवार; राजकीय भूकंपाचे संकेत…
नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला, चार पोलीस गंभीर तर १० जखमी
पैसे खात नाही असा अधिकारी-कर्मचारी पोलीस दलात नाही- निवृत्त IPS मीरा बोरवणकर
…म्हणून अनिल अंबानीचे स्थळ घेऊन ऐश्वर्या रायच्या घरी गेले होते अमिताभ बच्चन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.