काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने(Gujrat Titans) राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. (Modi and Amit Shah photo viral on social media after winning Gujarat Titans)
आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्याला भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर फिक्सिंग हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्टेडियममधील काही फोटो देखील व्हायरल होत आहेत.
People: IPL cameraman shows way too many girls
Amit Shah: Not today boys! pic.twitter.com/guc6HC08oC
— Newton (Android Version) (@memeroid_) May 29, 2022
सोशल मीडियावर अमित शहा यांच्याबद्दलचे काही मीम्स देखील व्हायरल होत आहेत. या सामन्यादरम्यानचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विक्ट्री पोजमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमधील अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप सोशल मीडिया युजर्सनी केला आहे.
#IPLFinals
RR-: Let's Do it Boys, We will win this MatchAmit Shah from Pavilion -: pic.twitter.com/oyvH3XuUef
— Pulkit🇮🇳 (@pulkit5Dx) May 29, 2022
युजर्सनी अमित शहांचे एक मीम देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. या मीममध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख ‘स्क्रिप्ट रायटर’ असा करण्यात आला आहे. याशिवाय गुजरात टायटन्स संघावर करण्यात आलेले अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील मीम्स व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/nptechindia/status/1531009088275873794?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1531009088275873794%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fgujarat-wins-trophy-by-match-fixing-memes-go-viral-on-social-media-1064489
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एकत्रित असलेल्या फोटोचे एक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्ट्री पोज देत असलेले दिसत आहेत आणि अमित शहा त्यांच्या बाजूला उभे आहेत. तसेच ‘मित्रों इलेक्शन हो या आयपीएल जितना तो हमें ही है’ लिहिण्यात आले आहे.
https://twitter.com/isachin_rajput/status/1531111408045215744?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1531111408045215744%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fipl%2Fgujarat-wins-trophy-by-match-fixing-memes-go-viral-on-social-media-1064489
हे मजेशीर मीम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कालच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रतहाम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी १३० धावांचे लक्ष दिले होते. गुजरात टायटन्स १९ व्या षटकात १३० धावा पूर्ण करत आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
महत्वाच्या बातम्या :-
पांड्याची हवा! गुजरात टायटन्सने पदार्पणातच कमावले कोट्यवधी, पहा कोणाला कोणतं बक्षीस मिळालं
मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ
लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…






