‘या’ प्रगत युरोपीय देशात जमिनीखाली पुरतात अंडरवेअर; कारण वाचून चकीत व्हाल

भारतात सर्वात जास्त लोक शेती करतात. पण आधुनिक पद्धतीने शेती केल्याचे आपल्याकडे फार कमी वेळा पाहायला मिळाले आहे. स्वित्झर्लंड देशात शेतीमध्ये एक अनोखा प्रयोग करतात, त्याबद्दल पण तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. आपण आपल्या शेतीतील मातीची तपासणी फार फार तर शेतात किंवा प्रयोगशाळेत करतो.

परंतु स्वित्झर्लंड देशात माती परीक्षणाचा असा एक प्रयोग केला जातो ज्याचा आपण कधी विचार पण केला नसेल.त्या देशात मातीचे परीक्षण करण्यासाठी २ हजार अंतर्वस्त्रे जमिनीत पुरली जातात. स्वित्झर्लंड देशामध्ये मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी तब्बल २,००० पांढऱ्या कापडयांना जमिनीत पुरले जाते.

अ‍ॅग्रोस्कोप संस्थेमार्फत हे परीक्षण केले जात असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांना ही अंतर्वस्त्रे पाठवली गेली आहेत. अ‍ॅग्रोस्कोप कंपनी काही विशिष्ट दिवसांनंतर हे कपडे बाहेर काढेल आणि त्यानंतर माती परीक्षणास सुरुवात करेल. अंडरवेअर ज्या ठिकाणी पुरली गेली होती त्या जागेवरून कळेल की तेथील माती उत्पादन घेण्यायोग्य आहे की नाही.

स्वित्झर्लंड देशात एक अनोखे संशोधन चालू असून अंडरवेअर जमिनीच्या आत ठेवल्यानंतर त्यात काय बदल झाला यावर पण संशोधक लक्ष ठेवतील. संशोधक हे पण पाहतील की त्या अंडरवेअर वर किती विषाणूंनी हल्ला केला आणि त्यानंतर त्या कापडाचे किती नुकसान झाल.

जास्त नुकसान झाले असेल तर संशोधक हा अनुमान लावतील की तेथील जमीन चांगली उत्पादन देते आणि मातीमध्ये पुरेसे घटक आहेत.अ‍ॅग्रोस्कोप कंपनीच्या सांगण्यानुसार या प्रयोगात जे शेतकरी सामील झाले असतील त्यांना चहाच्या पिशव्या पण जमिनीत पुरण्यासाठी दिल्या जातील.

त्यामुळे होईल असे की अंडरवेअर आणि चहाच्या पिशव्यांमधला फरक शोधला जाईल आणि त्यातून उत्पादन योग्य जमिनीची पारख केली जाईल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.