ऑनलाईन मागवला १७ हजार रुपयांचा मोबाईल; पण बॉक्समध्ये निघालं भलतंच काहीतरी

आग्रा | आग्रामधील एका दुकान व्यापाऱ्याने १७ हजार रुपयांचा एक मोबाईल ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवला होता. पण जेव्हा तो मोबाईल त्याच्याकडे डिलिव्हरी झाला तेव्हा त्याला धक्काच बसला.

कारण मोबाईलच्या बॉक्समधून भांडे धुवायचे तीन साबण निघाले. हे पाहून तो व्यापारी खूप संतापला. त्याने लगेच त्या डिलिव्हरी बॉयला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. गुलशन माकन असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

शाहगंजमध्ये त्यांचे कपड्याचे दुकान आहे. त्यांनी सांगितले की, ६ ऑगस्टला त्यांनी ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मोबाईल बुक केला होता. डेबिट कार्डने पैसे भरल्यावर मला १५०० रुपये डिस्काउंटही मिळाला.

रविवारी जेव्हा डिलिव्हरी बॉय मोबाईल घेऊन आला तेव्हा मी त्याला सांगितलं की, तू इथेच थांब. त्याच्या समोरच त्यांनी मोबाईलचा बॉक्स खोलला. तर त्यात ३ भांडे धुवायचे साबण निघाले.

त्यांनी डिलिव्हरी बॉयला पकडले आणि पैसे परत मागितले. तर तो म्हणाला की, मला याबद्दल काहीच माहीत नाही. मी फक्त डिलीव्हरी करतो. बॉक्सच्या आत काय आहे मला नव्हतं माहीत.

मग गुलशन यांनी त्याला थेट पोलीस स्थानकात नेले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मग कुरिअर कंपनीच्या मालकाला तक्रार गेल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.