Homeताज्या बातम्यामोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल...

मोबाईलवर बोलत असताना कॉल मर्ज करू नका, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे

मोबाईल फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना कॉल मर्ज करू नका. जर तुम्ही कॉल मर्ज केला तर तुमचे सोशल मिडीया अकाउंट हॅक होऊ शकते. या कॉलद्वारे सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यात देखील प्रवेश करू शकतात. देशात सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढत आहेत. यावरून केंद्र सरकारने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत असल्याचे केंद्र सरकाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. गृह मंत्रालयाने गुरुवारी आपल्या ‘सायबर दोस्त’ या ट्विटर हँडलद्वारे OTP (वन टाइम पासवर्ड) बाबत इशाराही जारी केला आहे.

फोनवर अनोळखी व्यक्तीशी बोलत असताना इतर कोणतेही कॉल कधीही एकत्र करू नका, असे गृह मंत्रालयाच्या त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. कॉल मर्ज होताच फसवणूक करणारे ओटीपी जाणून घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करतात. सोशल मीडिया अकाउंटही हॅक करू शकतात.

जर तुम्ही फसवणुकीचे बळी असाल तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक १५५२६० वर तक्रार नोंदवू शकता. याशिवाय cybercrime.gov.in या वेबसाइटवरही तक्रार दाखल करता येईल. ‘सायबर दोस्त’ हा ट्विटर हँडल सायबर सुरक्षेची माहिती शेअर करतो. मोबाईल क्रमांकावर डिजिटल पेमेंट करताना किंवा बँकेशी संबंधित कोणताही व्यवहार करताना एक OTP येतो.

त्या OTP ची नोंद झाल्यानंतरच तो व्यवहार पूर्ण होतो. अशा परिस्थितीत तुमचा ओटीपी क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय बहुतांश लोक फोन आणि मेसेजद्वारे OTP शेअर करतात. असे करणे टाळा अन्यथा तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडू शकता. मेट्रो, रेल्वे स्टेशन, पार्क अशा अनेक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा आहे.

इंटरनेट आणि फ्री वायफाय वाचवण्यासाठी अनेकदा लोक सार्वजनिक वायफायद्वारे ऑनलाइन व्यवहार करतात. या फ्री वायफायमध्ये काही फसवणूकही होऊ शकते. या स्थितीत तुम्ही ऑनलाइन व्यवहार केल्यास बँकेशी संबंधित तुमची वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. तेव्हा लक्षात ठेवा, सार्वजनिक वायफायवर कधीही तुमचे व्यवहार करू नका.

महत्वाच्या बातम्या :-
बापरे! सातवी पास युवकाने ३० हजारात बनवली ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी..
“गोडसेंचे गोडवे गाणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही, पण मोदींवर टीका करणाऱ्या किरणला देशद्रोही ठरवतात”
पुण्यातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला अजित पवारांच्या नावाने धमकी, मागितली २० लाखांची खंडणी