काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला; दगडफेक व आगही लावली, ६० पोलीस जखमी

 

बंगळुरू | सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सोशल मीडियाचा वापर जोरदार सुरू आहे. यात अनेक लोकांकडून चुकीच्या पोस्ट केल्याने अनेक वाद देखील निर्माण होत आहे.

आता एका सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये हिंसाचार झाला आहे. जमावाने एका आमदारच्या घरावर हल्ला केला. जमावातल्या काही जणांनी घरावर दगडफेकही केली आहे.

काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. रात्रीच्या सुमारास जमावाने श्रीनिवास मूर्तींच्या घरावर दगडफेक केली.

या दगडफेकीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमावाने पोलिसांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली.

या जमावाने केलेल्या हल्ल्यात ६० पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लावण्यात आला आहे.

दरम्यान, या जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या यांच्या घरावर दगडफेक केली होती, तसेच त्या परिसरात आग देखील लावली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.