अलीकडे राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. तर आता याच दौऱ्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे.
तर जाणून घेऊया नेमकी काय आहेत दौरा स्थगित होण्याची प्रमुख कारण..? आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलला आहे. याबाबत खुद्द राज ठाकरेंनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं भवितव्य त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असल्याची माहिती मिळत आहे.
#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला.
‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली होती. अखेर राज ठाकरेंनी ट्विट करत दौरा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.
राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलंय की, ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित, महाराष्ट्र सैनिकांनो या.. यावर सविस्तर बोलू,’ असं ट्विट सध्या राज ठाकरेंनी केलं आहे. राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते हेमंत संभुस यांनी दिली आहे.
दरम्यान, एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती. या कारणामुळेच काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत आले होते. आता परत याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. राज यांच्या पायाच्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
केतकी प्रकरणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रीया, ‘केतकीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण..
५० हजारांची पुस्तके घेणाऱ्या राज ठाकरेंच्या एका फोनवर राज्यातली ग्रंथालये सुरू झाली होती; वाचा किस्सा..
ना बॉडीगार्ड ना मोठेपणा! रतन टाटा नॅनो कारने एकटेच पोहोचले ताज हॉटेलला, पहा व्हिडीओ
मिटींगमध्ये पोहोचलेल्या शिक्षकांमध्ये जेवणाच्या ताटासाठी घाणेरडे भांडण, व्हिडीओ झाला व्हायरल