Homeताज्या बातम्याडोक्यात सळई घुसलेल्या मुलाच्या मदतीला धावून आले वसंत मोरे; एका दिवसात जमवून...

डोक्यात सळई घुसलेल्या मुलाच्या मदतीला धावून आले वसंत मोरे; एका दिवसात जमवून दिले ‘इतके’ लाख

पुण्याच्या मुंढवा येथील कल्याणी स्टील कंपनीसमोर एका इमारतीवर केबल वायर टाकण्याचे काम सुरु होते. त्यावेळी एका १२ वर्षीय मुलगा तिथून खालून जात असताना त्याच्या डोक्यात लोखंडी सळई घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. चेतन महेश गाढवे असे या मुलाचे नाव आहे.

संबंधित घटना ही एक आठवड्यांपूर्वी घडली होती. कुटुंबियांनी त्याला तातडीने पुण्यातील नोबल रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचाराचा खर्च खुप होता. मुलाची घरची परिस्थितीही बेताचीच आहे. अशात उपचाराचा खर्च कसा करणार हा प्रश्न पडला होता.

जखम खोलवर झाल्याने त्याच्यावर ऑपरेशन करणे गरजेचे होते. त्यासासाठी खर्चही लागणार होता. परंतू आर्थिक परिस्थिती खराब असल्याने ऑपरेशन लांबणीवर पडले होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना माहिती मिळाली आणि मुलाच्या कुटुंबाच्या मदतीला ते देवदूतासारखे धावून आले.

वसंत मोरे यांनी रुग्णालयाला भेट दिली त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच अधिकाधिक नागरिकांनी चेतनच्या वडिलांना मदत करावी, यासाठी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर चेतन गाढवेच्या वडिलांच्या अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले.

वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे चेतनच्या वडिलांच्या अकाऊंटवर नागरिकांनी एका दिवसात तब्बल १४ लाख रुपये जमा केले. वसंत मोरे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. मुलाच्या उपचारासाठी एका दिवसात इतके पैसे जमा झाल्याने चेतनच्या वडिलांनी वसंत मोरे यांचे आभार मानले आहे.

मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहित आहे, पण हा देव माणूस माहित नव्हता. मी या देव माणसाला आयुष्यभर कधीच विसरणार नाही. या दुनियेत कुणी कुणाला दोन रुपये सुद्धा देत नाही. पण या देवाच्या एका शब्दामुळे १४ लाख रुपये खात्यात जमा झाले, असे चेतनच्या वडिलांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

महत्वाच्या बातम्या-
“निवडणूका आहे म्हणून इंदुरीकरांना पाठीशी घातले जात आहे, त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा…”
भयानक! ४ दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती आली परत, जालन्यातील घटनेने सर्वत्र खळबळ
कोरोना लसीने केला घात, शेतकऱ्याने गमावला डावा हात, उपचारासाठी लाखो रुपये खर्च