गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती.(mns vasant more facebook post viral)
आता पुन्हा एकदा मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे चर्चेत आले आहेत. सध्या मनसे नगरसेवक वसंत मोरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमातून नगरसेवक वसंत मोरे यांनी वडिलांची भावुक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्ट सोबत मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी वडिलांच्या सायकलचा फोटो देखील शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी लिहिले की, “या सायकलच्या मागील कॅरिअरवर अनेक दिवस रात्री अनेक वर्षे बसून फिरलोय…ही सायकल कमीत कमी ३० वर्षांपूर्वीची आहे. कुऱ्हाड ही आजून तीच आहे. सगळी प्रॉपर्टी विकली तरी हिची सर येणार नाही…कारण जेव्हा गमावण्यासारखे जवळ काहीच नव्हते तेव्हा फक्त हीच होती.”
“भले आज माझ्याकडे Audi , BMW , Innova Crysta , Harley Davidson आहे, पण त्यामधे बसण्यासाठी मला त्या सायकलवर घेऊन फिरणारा वाघासारखा माझा बाप आज नाही…म्हणून ही सायकल मी अजून जपून ठेवली आहे”, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केली आहे.
https://www.facebook.com/vasantmore88/posts/568833657934341
काही दिवसांपूर्वीच मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांना सरहद्द संस्थेचे संजय नहार यांच्याकडून एक पत्र आलं होतं. या पत्रात संजय नहार यांनी वसंत मोरेंचं तोंडभरून कौतुक केलं होतं. पक्षासाठी वसंत मोरे यांच्यासारखा कर्तृत्ववान सरदार महत्वाचा आहे, असे या पत्रातून सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांनी सांगितलं होतं.
तसेच राजाने कर्तृत्ववान सरदाराचा सन्मान राखला पाहिजे, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी हे पत्र त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलं होतं. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी सरहद्द संस्थेच्या संजय नहार यांचे आभार मानले होते. या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :-
पोस्टमास्तरने फिक्स डिपॉझिटच्या नावाखाली जमा केले एक कोटी, IPL मध्ये लावला सट्टा; झाली अटक
कपडे काढून रस्त्याच्या कडेला पुरले, अखेर गायिकेच्या खुनाचा झाला उलगडा, वाचून अंगावर येईल काटा
५ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार जस्टिन बीबर, गेल्यावेळी अपमान झाल्यामुळे रातोरात सोडला होता देश






