गेल्या काही दिवसांपासून मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी दर्शविली होती. त्यानंतर वसंत मोरे(Vasant More) यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी वसंत मोरे पुण्यातील काही मनसे पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता टीका केली होती.(mns vasant more facebook live)
आता पुन्हा एकदा मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मनसे पक्षातील काही कार्यकर्त्यांवर टीका केली आहे. वसंत मोरे यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमुळे मनसे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
या फेसबुक लाईव्हमध्ये मनसेचे नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, “वसंत मोरे आणि निलेश माझिरे आपल्या २० समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, या अफवा पसरवल्या जात आहेत. निलेश माझिरे शिवसेनेत प्रवेश करणार हे ऐकल्यावर माझ्यापेक्षा जास्त धक्का माझिरे यांना बसला आहे. निलेश माझिरे हा मनसेचा माझ्यानंतरचा पुण्यातील प्रसिद्ध चेहरा आहे.”
“निलेश माझिरे हा एक शहराध्यक्ष आहे. निलेश माझिरे याने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर या अफवा पसरवण्यात आल्या आहेत. या अफवा कोणी पसरवल्या मला माहित नाही. पण या अफवा पसरवून माझिरे यांना डावलण्यात आलं आहे”, असे मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्हमध्ये सांगितले आहे.
“मनसे पक्षातील काही कार्यकर्त्यांनी या अफवा पसरवल्या आहेत, असा आरोप मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केला आहे. यामुळे पुण्यातील मनसे पक्षातील खदखद बाहेर आली आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना त्रास होईल, अशी कामे काही पार्ट टाइम कार्यकर्ते आहेत”, असे वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्हमध्ये सांगितले.
यापूर्वी देखील नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यातील काही मनसे कार्यकर्त्यांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा होणार आहे. ही सभा पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुलात होणार आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावर निशाणा साधतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पतीने सामना जिंकवताच मुलीला कडेवर घेऊन नाचू लागली अश्विनची पत्नी, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल
बाॅलीवूडला मागे टाकत ‘धर्मवीर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमाई ऐकून डोळे पांढरे होतील
लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा स्फोट, नवरदेवाने गमावले दोन्ही डोळे, वाचून हादराल