Share

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी, साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष; राज ठाकरेंची तडकाफडकी कारवाई

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(mns vasant more extrusion form party)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakre) यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला बाबू वागस्कर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर हजर होते. पण या बैठकीला वसंत मोरे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.

यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळत होती. तसेच वसंत मोरेंनी मनसे पक्षाचा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप देखील सोडला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात वसंत मोरेंनी विधान केले होते.

“जर मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा”, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं होतं. यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षाच्या शाखेवर भोंगे लावले होते. पण राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे वसंत मोरे नाराज होते.

https://www.facebook.com/mnsadhikrutpage/posts/5012378505520643

भूमिकेला नकार दिला होता. यावेळी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीये. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं. याचबरोबर मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही”, असे त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्यावर नाराज होते. या नाराजीतूनच राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आता वसंत मोरे यावर कोणतं पाऊल उचलणार? याची उत्सुकता जनतेला लागली आहे. राष्ट्रवादी पक्षाने वसंत मोरेंना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचं काय झालं? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी काढला पळ
वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार? राज ठाकरेंवर नाराज होत मोठी पावले उचलल्याने चर्चांना उधाण
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार राष्ट्रवाजी काँग्रेसमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now