राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असताना देखील शिवसेनेच्या संजय पवार(Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची ९ मते फुटली आहेत. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. (mns tweet about shivsena party )
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले आहेत. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभव झाल्यानंतर मनसेने टोला लगावला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली.”
औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले ? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला.सेना लढाईतही हरली व तहात पण हरली. #राज्यसभानिवडणूक
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 10, 2022
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले”, असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाच्या पियुष गोयल, अनिल भोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा देखील राज्यसभेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि विजयी उमेदवार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळवला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सत्ताधाऱ्यांना धूळ चारणारे धनंजय महाडिक आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल खास गोष्टी
शाहरूखने अखेर सोडले मौन, NCB वर गंभीर आरोप करत म्हणाला, आम्हाला राक्षसासारखे…
‘या’ माणसामुळे वाचला सलमान खानचा जीव, नाहीतर बंगल्याबाहेरच झाली असती त्याच्यावर फायरिंग