लाव रे तो व्हिडीओ! वाहतूक पोलीस फेरीवाल्यांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ मनसेने केला पोस्ट

फेरीवाले आपल्याला सगळीकडे दिसून येतात. भारतातील कोणत्याही शहरात जावा तुम्हाला रस्ता, फुटपाथ किंवा उड्डाणपुलाखाली फेरीवाले दिसतील. फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर कचरा पसरतो किंवा कुजलेल्या भाजीपाल्यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरते.

बेकायदा फेरीवाल्यांबाबत जेव्हा महापालिकेकडे तक्रार केली जाते तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे कोणालाच माहिती नसते. कारण दुसऱ्या दिवशी ते फेरीवाले आपल्याला त्याच ठिकाणी दिसतात आणि सडलेला भाजीपाला तेथेच टाकतात आणि इकडे तिकडे कचरा टाकतात.

पण कधी कधी कारवाईच्यावेळी हे फेरीवाले गायब होतात किंवा त्यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी गायब असतात. पण वाहतुक पोलिसांचे एक वाईट सत्य एका व्हिडीओने समोर आणले आहे. फेरीवाले महापालिकेला घाबरत नाहीत किंवा त्यांना अधिकाऱ्यांचे कसलेही भय राहिलेले नाही असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.

आता हे सगळ्यांना माहिती आहे की फेरीवाल्यांकडून पोलिस हफ्ता वसुली करतात. यामुळे त्यांनाही यासाठी जबाबदार धरले जात आहे. आणि आता याचा भांडाफोड मनसेने केला आहे. मनसेच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर वाहतूक पोलिसांचा आणि फेरीवाल्यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

यामध्ये मनसेने असा दावा केला आहे की वाहतूक पोलिस फेरिवाल्यांकडून पैसै घेताना दिसत आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी महापालिकेच्या अधिकारी कल्पना पिंगळे यांच्यावर फेरिवाल्यांकडून हल्ला झाला होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर फेरिवाल्यांचा प्रश्न ऐरनीवर आला आहे. त्यानंतर फेरिवाल्यांना पोलिसांनी अभय देणे ही चिंतेची बाब आहे. ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
जुहूमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांमध्ये आणि क्लीनअप मार्शलमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
‘या’ अभिनेत्याच्या घरी गणेश चतुर्थी दिवशी झालं चिमुकलीच आगमन; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
संजय राऊतांसारख्या तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार?, चित्रा वाघ यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.