एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत येण्याचं आवाहन केलं होतं. ज्या बंडखोर आमदारांना कुटुंबाप्रती प्रेम आहे, त्यांनी परत यावं, असे आदित्य ठाकरे(Aaditya Thakre) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणाले होते.(mns shalini thakre tweet about aaditya thakre)
यावरून मनसेने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. “बंडखोर आमदारांना आधी डुक्कर, गद्दार असे म्हणायचे आणि मग त्यांना परत बोलवायचे”, अशा शब्दांत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची…..पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे …..!!!!”
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची…..
पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे …..!!!!#गद्दार #आदित्यठाकरे #शिवतीर्थ #याचिमण्यांनो— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 11, 2022
या ट्विटमध्ये मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. ज्या व्यक्ती पक्ष सोडून जातात, अशा लोकांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचार देखील करत नाहीत, असे म्हणत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना यांना टोला लगावला आहे. या ट्विटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला होता. यावेळी भाषणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत येण्याचे आवाहन केले होते. या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे माफ करतील, असे देखील आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितले होते.
“अनेक बंडखोर आमदार सांगत आहेत की आमचं ठाकरे कुटूंबावरती प्रेम कायम आहे. जर प्रेम कायम असेल तर या बंडखोर आमदारांनी पक्षात परत यावं. त्यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. त्यांना माफ केलं जाईल. जा बंडखोर आमदारांना तिथेच राहायचं आहे. त्या आमदारांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी”, असे आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?