Share

MNS Sandeep Deshpande: ‘व्यापारी आहात, व्यापार करा, बाप बनायचा प्रयत्न करु नका’, मनसे नेत्याने अमराठी व्यापाऱ्यांना सुनावले

MNS Sandeep Deshpande:  मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात मराठी-अमराठी वाद चिघळत असताना, मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. “आमच्याकडे मराठी नव्हे, हिंदीच चालते,” असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे या दुकानदारावर हल्ला झाल्याची माहिती पुढे आली. यानंतर त्या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी गुरुवारी मोर्चा काढून मनसेविरोधात निषेध व्यक्त केला.

सुशील केडियाचा राज ठाकरेंवर जोरदार हल्ला

या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही वादळ उठले. एक्स (Ex-Twitter) या प्लॅटफॉर्मवर सुशील केडिया (Sushil Kedia) नावाच्या युजरने मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना थेट ललकारत लिहिले, “राज ठाकरे ड्रामा बंद कर. तुझे 10-12 गुंड दोन-चार कानाखाली मारतील. पण आम्ही आमरण उपोषणाला बसलो तर तुला हात जोडून माफी मागावी लागेल.”

संदीप देशपांडेंची सडेतोड प्रतिक्रिया

या ट्विटचा जोरदार प्रतिवाद करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर स्पष्ट इशारा दिला, “व्यापारी आहात, व्यापार करा. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल. बाकी मेहता-बहता चड्डीत राहावं. तूर्तास एवढंच.” या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजप आणि मनसेमध्ये संघर्ष, कार्यकर्त्यांचा पक्षांतर

या सगळ्या वादामुळे मीरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayandar) स्थानिक राजकारण ढवळून निघालं आहे. शांती पार्क (Shanti Park) भागातील जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानावर झालेल्या हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवून बंद पाळला. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी या आंदोलनामागे भाजपच्या (Bharatiya Janata Party – BJP) स्थानिक नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हे प्रकरण शांततेत मिटवण्याची तयारी होती. पण भाजपच्या लोकांनी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला प्रवृत्त केलं.”

कुंदन मानकरांचा मनसेत प्रवेश

भाजपच्या (BJP) भूमिकेवर नाराजी व्यक्त करत पेंकरपाडा (Penkarpada) येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर (Kundan Suresh Mankar) यांनी गुरुवारी भाजपला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) जाहीर प्रवेश केला.
मनसेच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now