ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून आव्हाडांच्या पत्नी संतापल्या; राष्ट्रवादीच्या मदतीला मनसे धावली

ठाणे | गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. उपचाराअभावी रूग्णांना प्राण गमावावे लागत आहेत. देशात ऑक्सिजन, बेड, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक निर्बंध लावत आहेत.

ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठाणे महानगरपालिकेसमोर बसून ऋता आव्हाड यांनी आंदोलन केले आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी साथ दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली.

ठाण्यात कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावरून पोस्टर्स आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्त्यांसह आव्हाड यांनी थेट ठाणे महानगरपालिकेसमोर ठिय्या मांडला. ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही. ठाणेकरांचे जीव वाचवा. त्यांना मृत्यूच्या दारेतून बाहेर काढा. असं लिहिलेले पोस्टर्स हातात घेऊन राष्ट्रवादी आणि मनसेने आंदोलन केले आहे.

यावेळी ऋता आव्हाड म्हणाल्या ठाण्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर यांच्याबाबत भयान अवस्था आहे. परिस्थीती फार बिकट आहे. पालिका आयुक्तांनी परिस्थीची पाहणी करावी. कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत ठाणे महानगरपालिका गंभीर दिसत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार भारतात गेल्या २४ तासांमध्ये १,७१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात १ लाख ८० हजार ५३० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. सध्या २० लाख ३१ हजार ९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर चोर, उपचाराच्या नावाखाली लुबाडतात; कॉमेडियनचं वादग्रस्त वक्तव्य
कोवीड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवन, रेमडिसीवर वाटपात भेदभाव; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर DSP ड्युटीवर, तरी लोकांचे नियम मोडण्याचे काम सुरुच

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.