MNS : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. यातच एकनाथ शिंदे शिवसेनेवर आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याबाबत वाद सुरु आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
यासोबतच आता शिवाजीपार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार? यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी महानगरपालिकेकडे परवानगी मागण्यासाठी शिवसेनेकडून दोनदा पत्र देण्यात आले आहे. मात्र, यावर पालिकेने अजून कुठलाही निर्णय दिलेला नाही.
त्यामुळे शिवाजी पार्कवर नेमका कुणाचा दसरा मेळावा होईल याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यातच आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसेने यासंदर्भात ट्विट करत शिवसेना आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केले आहे.
‘शिवतीर्थ’ वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दरवर्षी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजेच शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. परंतु, यावर्षी शिवसेनेत फूट पडल्यामुळे या मेळाव्याबाबत वाद निर्माण झाला आहे. यातच मनसेने या वादावर भाष्य केले आहे.
तसेच “दसरा मेळाव्याबाबत संभ्रम नाही. दसरा मेळावा आमचाच होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा नेमका कोणत्या गटाचा होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदेव बाबांनी केलं मोठं व्यक्तव्य; थेट शिवसेनेच्या मुळाशी घातला घाव, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
काॅंग्रेसला आजवरचे सर्वात मोठे भगदाड; उपमुख्यमंत्र्यासह तब्बल ५१ बडे नेते राजीनामा देणार
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये! काल फडणवीस, तावडे; आज बावनकुळे ‘शिवतीर्थ’वर, वाचा नेमकं घडतंय तरी काय?