एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची काल औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. यावेळी भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?”, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना टोला लागवला होता.(mns prakash mahjan statement on akkbaruddin owesi)
तसेच एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेतले. औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेण्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. औरंगाबादमधील मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी देखील एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?” अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.
आज मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल राज ठाकरेंविरोधात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. “राज ठाकरे एकटे वाघ आहेत. काही लोक भुंकत आहेत. पण राज साहेब आपला मार्ग सोडणार नाहीत”, असे मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
यावेळी औरंगजेबाच्या कबरीच्या दर्शन घेण्यावरून प्रकाश महाजन यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार टीका केली. “अकबरुद्दीन ओवेसी काल औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवण्यासाठी गेले असल्याचे मला समजले. तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?”, अशा शब्दांत मनसे नेते प्रकाश महाजन अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका केली आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, “अकबरुद्दीन ओवेसीचा पंजा हिंदूच होता. हा बाडगा आम्हाला काय शिकवतो? तुला काय उत्तर द्यायचं आहे ते दे. राजसाहेब कशाला आम्हीच तुला उत्तर देऊ. तुझी औकाद आहे काय? राजसाहेबांनी स्वतःच्या हिम्मतीवर साम्राज्य उभं केलं आहे. तुमच्यासारखे बापजाद्याच्या जीवावर खातं नाही बसले”, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे.
“राजसाहेबांना घरातून काढलं नाही. उलट त्यांनी घर उभं केलं. आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले”, असे देखील प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे. “इस्लामने अनेक वर्ष पर्यटन करून हिंदू संपले नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही संपणार नाही. राज साहेबांसारखा एक हिंदुत्ववादी नेता आता उभा राहिला आहे, याची भीती त्यांना वाटत आहे”, असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘वेळ आली आहे बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’, तरुणाच्या आक्षेपार्ह ट्विटवर आव्हाड संतापले
नितेश राणेंच खुलं आव्हान; “पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…”
कंगना आता थेट बॉलिवूडवरच बरसली; म्हणाली, ईद पार्टीत सगळ्यांनी धाकडचे कौतुक केले पण..






