एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. कल्याण डोंबिवली मधील आजी-माजी नगरसेवकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.(mns post about shivsena uddhav thakre and aaditya thakre)
यावरून मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे(Aaditya Thakare) यांना खोचक टोला लगावला आहे. नियतीचा खेळ! ज्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले, तेच आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आहेत, असा टोला मनसेने लगावला आहे. यावेळी मनसेने शिवसेनेचा उल्लेख ‘शिल्लक सेना’ असा केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपलेला पक्ष आहे, अशी टीका काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे वृत्तांत या अधिकृत पेजवरून यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो देखील शेअर करण्यात आला आहे. काही
या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये!”
https://www.facebook.com/MNSVruttantAdhikrut/posts/578870390275234
मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील ट्विट करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा उल्लेख ‘चमत्कार बाबा’ असा केला होता.
संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यातील महानगरपालिकेत एकच नगरसेवक उरला आहे. या नगरसेवकाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर करतील, असा खोचक टोला मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला होता. दिवसेंदिवस शिवसेनेतून शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. यावरून मनसे सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महाविकास आघाडीला मोठा दणका; शिंदे सरकारकडून ५ हजार कोटींची कामे रद्द
रणवीर सिंग दीपिकाबद्दल असं काहीतरी म्हणाला की भडकली आलिया, म्हणाली, हे फक्त यासाठी बोलला ना..
शिवसेना संपायला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार कारण.., नारायण राणेंची सडकून टीका