मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईदरम्यान महेंद्र भानुशाली यांच्याजवळ असणारे काही भोंगे देखील जप्त करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानांतर महेंद्र भानुशाली यांनी सर्वात आधी हनुमान चालिसा लावली होती. त्यानंतर महेंद्र भानुशाली(Mahendra Bhanushali) यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता.(mns politician mahendra bhanushali got arrested by mumbai police)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा झाली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं होतं. ४ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती.
उद्या मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही नोटीस देण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कलम १४९ अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्यास आणि सार्वजनिक मालमतेचे नुकसान केल्यास कारवाई करण्यात येते. तसेच सार्वजनिक मालमतेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देखील घेण्यात येते.
#WATCH | Maharashtra: Mumbai Police seize loudspeakers from MNS office and detain party's Chandivali unit chief Mahendra Bhanushali and others. pic.twitter.com/irR9Y9nQJ6
— ANI (@ANI) May 3, 2022
उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून काही भोंगे देखील जप्त करण्यात आले आहे.
यासंदर्भात मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज सिटी पोलीस चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अटींचा भंग आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
इफ्तार पार्टीत उर्फी जावेदने सलवार कमीज घालून केला कहर, सांगितले ‘या’ अटीवर करणार लग्न
PHOTO: लग्नानंतर वेगवेगळ्या मुडमध्ये दिसली आलिया भट्ट, चाहते म्हणाले, ‘मिस्टर कपूर कुठं गेले?’
‘राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारनं तयार राहावं’