Share

मनसेने आखला मोठा प्लॅन, कार्यकर्त्यांसाठी उभी केली तब्बल २ हजार वकिलांची फौज

गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, अशी भूमिका मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.(mns party big plan to select 2000 advocate for party workers)

३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे ३ मे नंतर मनसे पक्षाकडून मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यादरम्यान कोणत्याही मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्यास पक्षाकडून वकील दिले जाणार आहेत.

या कायदेशीर लढाईसाठी मनसे पक्षाकडून दोन हजार वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यास हे वकील न्यायालयात त्यांच्या बाजूने खटला लढणार आहेत. १ मे ला महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मनसे पक्षाकडून या सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर आले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील ‘राजमहाल’ या निवासस्थानी वास्तव्यास होते. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभेसाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत. औरंगाबादला जाण्यापूर्वी १०० ते १५० ब्राम्हणांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले आहेत.

यावेळी ब्राम्हणांनी काही विधी देखील केले. राज ठाकरे यांच्या पुण्यातील ‘राजमहाल’ या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला अनेक संघटनांनी विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी औरंगाबाद शहरात शांती रॅली काढणार आहेत.

तसेच भीम आर्मीने देखील राज ठाकरे यांना सभा उधळून लावण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेदरम्यान कायदा व सुव्यवस्था मोडल्यास त्यांची सभा आम्ही उधळून लावू, असे भीम आर्मीतर्फे सांगण्यात आले आहे. यावर राज ठाकरे आजच्या सभेत काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
नेतेमंडळींवर हजारोंचा वाहतूक दंड, चंद्रकांत पाटील म्हणाले घरंदारं विकायची वेळ येईल
टेम्पो चालकाचा मुलगा MPSC मध्ये महाराष्ट्रात आला पहिला, पुर आला तरी सोडला नाही अभ्यास
वसंत मोरे अजूनही पक्षावर नाराज? पक्ष सोडण्याचा निर्णय? ‘त्या’ कृतीने शिक्कामोर्तब झाल्यात जमा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now