मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११ लाखांची मदत, इतर आमदार कधी जागे होणार?

रायगड । मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला, दरडी कोसळल्या. यामध्ये तलीये गावावर दरड कोसळली आणि अनेकांचे यामध्ये मृत्यू झाले. आता मदतीची मागणी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी मोठी मदत केली आहे.

राजू पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी तळीये गावासाठी ११ लाखांची मदत जाहीर केली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हे गाव पुन्हा उभे करावे लागणार आहे.

मूसळधार पावसामुळे रायगडमध्ये महाड, चिपळूण याठिकाणी पूर आला होता. अनेक घरे पाण्याखाली गेली होती. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांच्या सेवेला सामाजिक संस्था आणि मनसे कार्यकर्ते धावून गेले आहेत.

मनसेतर्फे अन्नधान्य, कपडे तसेच गृहउपयोगी वस्तू देण्यात येत आहे. यावेळी आमदार पाटील, सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मनसे पक्षाकडून केली जाईल, असे आश्वासन दिले. जीवनावश्यक वस्तू देखील देण्यात आल्या आहेत.

तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळून दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेची सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याच गावाला आमदार राजू दादा पाटील यांच्याकडून ११ लाखांची मदत करण्यात आली आहे. यामुळे इतर आमदार कधी मदत करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

ब्रेकिंग! ऑलम्पिकच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा फायनलमध्ये, सुवर्णपदकाकडे लागल्या सर्वांच्या नजरा

देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव, एका वडापावची किंमत ऐकून बसेल धक्का..

“आपल्याच इतकी लोकसंख्या असणाऱ्या चीनची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.