MNS : मुंबईतील गोरेगाव येथे काल शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांनी भाजपसोबतच एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल केला.
यावरून सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच आता मनसेनेही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सभेमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला मिंधे तर राज ठाकरेंना मुन्नाभाई असे संबोधले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “जो कमजोर मुलगा असतो त्याच्यावर आईवडिलांचं प्रेम जास्त असतं. कारण त्यांना माहिती असतं की जो कर्तृत्ववान मुलगा असतो तो कमावेल, त्याचं त्याचं खाईल, त्याचं घर घेईल. परंतु, कमजोर मुलावर आईवडिलांचं प्रेम जास्त असतं. त्यामुळे त्याला ते घर देतात, सगळं देतात. पण त्याच्यात कर्तृत्व नसतं.”
तसेच “बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. यांच्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग ते कोणाला मिंधे, कोणाला मुन्नाभाई तर कोणाला काही म्हणत असतात. ज्यांच्यात स्वतःचं कर्तृत्व नाही त्यांना काय उत्तर द्यायचं?” असेही संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1572626891433185281?s=20&t=9_PaXlKqDYJ-QZwPrDHywQ
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आणखी एक वक्तव्य केले आहे. यात ते म्हणाले की, “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमचीपण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा,” अशा शब्दांत नाव न घेता संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
BJP : २६ जुलैच्या पुरात बाळासाहेबांना एकटे सोडून स्वतः फाईव्हस्टार हाॅटेलमध्ये रहायला गेलते त्याचे काय? भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल
eknath shinde : एकनाथ शिंदेंना दररोज सलाईन लावली लागते; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Lumpy skin disease : शेतकऱ्यांनो सावधान! लम्पी लसीकरणाच्या नावाखाली डॉक्टरांकडून सुरू आहे गोरखधंदा
politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का; ऐतिहासिक दुर्गाडी गडावरील देवीच्या उत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय