मनसेच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील पक्ष सोडणार? मोठे वक्तव्य केल्याने चर्चा सुरू

पुणे । गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे पक्ष सोडणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. याबाबत आता त्यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

रुपाली पाटील यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. यामुळे देखील त्यांच्यावर टीका केली जात होती. यावर त्या म्हणाल्या की मी एक वकील म्हणून ती वैयक्तिक पोस्ट केली होती. याबाबत मी ती कोणत्याही मीडियाला दिली नव्हती, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

मी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पुण्यातील कामांसाठी भेटले, मी मनसे सोडणार नाही मात्र पक्षातील लोकांनी जर त्रास दिला तर मला पक्ष सोडावा लागेल. असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र आपण राष्ट्रवादीत जाणार की अन्य कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी काही सांगितले नाही. मी कोणत्याही पक्षात जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

माझं आमदारकीचे तिकीट कापले गेले तरी मी पक्ष सोडला नाही.पक्षातील लोकांनी माझ्यासोबत राजकारण केले, त्यांचे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. असेही त्या म्हणाल्या. रुपालीला थांबवायचे कसे याबाबत काहीजण सतत प्रयत्न करत आहेत. मी मर्दानी स्त्री आहे मी सहन करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

पक्षामध्ये काही काम न करणारी रिकामटेकडी नेते मंडळी आहे. यांच्याबाबत राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे. जाणूनबुजून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. आमच्याच मनसेवाल्यांना वाटत आहे की मी राष्ट्रवादीत जावे. भाजपकडून देखील आपल्याला ऑफर होती. असा खुलासा देखील त्यांनी केला आहे.

मी 14 वर्षांपासून मनसेत आहे. मी राज ठाकरे यांच्याकडे बघून काम करते. येणाऱ्या काळात मला असाच त्रास दिला तर मला पक्षातील लोक पर्याय शोधायला लावतील, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याबाबत वक्तव्य केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.