गेल्या अनेक दशकांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी ओळख आहे. पण आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट असे संबोधले जाऊ लागले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये झळकणाऱ्या बॅनरवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे.(mns leader raj thakare banner in mumbai)
या बॅनरमुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भलेमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट असे संबोधतात. पण आता मनसे पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी राज ठाकरेंच्या स्वागताचे भलेमोठे बॅनर घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत.
या बॅनरवरती राज ठाकरे यांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची मुंबईत जोरदार चर्चा होत आहे. काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. मनसे या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे समजत आहे.
राज्यव्यापी अधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण केले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर गेल्याची टीका भाजप पक्षकाडून करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकांमध्ये उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
खाण्या-पिण्यातील ‘या’ पाच चुकांमुळे पुरुषांचे गळतात केस, आजच आपल्या आहारात करा बदल
मी तर तुझ्या परिसरात आहे! मुस्लिम व्यक्तीच्या स्वप्नात आले श्रीकृष्ण भगवान, ४० लाख खर्च करून उभारले मंदिर
“मी उघड्यावरच शौचाला बसलो आणि मागे वळून पाहिले तर..”, करण जोहरने सांगितला तो लाजिरवाणा किस्सा