खळबळजनक! मुंबईतील मनसे नेत्याला मारण्याची सुपारी ठाणे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राबोडी प्रभाग अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमील शेख हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफला शनिवारी यश मिळाले आहे. शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौमध्ये अटक केली आहे.

टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती. आरोपी मनसुरीला लखनऊ कोर्टातून ठाणे गुन्हे शाखा युनिट १च्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर त्याला सोमवारी ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

जमिल शेखला मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्लाने सुपारी दिली होती, असा दावा यूपी एसटीएफने शुटर इरफानच्या अटके नंतर केला आहे. या सुपारीसाठी दहा लाख रुपये रक्कम निश्चित करण्यात आली होती. यातील दोन लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते, असंही यूपी एसटीएफने म्हटले आहे.

दरम्यान, मनसे पदाधिकारी जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ठाण्याच्या राबोडी परिसरात संबंधित घटना घडली होती. राबोडी येथे त्यांच्या दुचाकीजवळ त्यांचा मृतदेह आढळला होता.

त्यावेळी तेथील स्थानिकांनी दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असा दावा केला होता. पण पोलिसांनी याप्रकराची सखोल चौकशी केली असता त्यांची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.

महत्त्वाच्या बातम्या 

आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघूवीर खेडकर व मंगला बनसोडे ढसाढसा रडल्या

रघूवीर खेडकर व मंगला बनसोडे ढसाढसा रडले; कारण ऐकून तुमचंही काळीज पिळवटून जाईल

मोठी बातमी: राज्यात कुठल्याही क्षणी लॉकडाऊन होणार? सरकारचा निर्णय झाल्यात जमा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.