…तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढत चाललाय; मनसे नेत्याने दिला इशारा

मुंबई | इंडियन आयडल सीजन १२ हा एक सुप्रसिध्द टेलिव्हिजन शो आहे. या शोमधून स्पर्धक भरभरून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. मात्र हा सीजन इतर सीजन पेक्षा जास्त चर्चेचा ठरला आहे. सतत कोणत्या ना कोणत्या प्रसंंगामुळे शो ला वेगळ वळण मिळत गेलं आहे.

शोमध्ये असे अनेक प्रसंग दाखवले जातात की ज्यामधून प्रेक्षकांचे मन हेलावून जातं. या शोवर प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून टीका करत आहेत. त्याचबरोबर शोमधील पुर्व स्पर्धकही शोबाबत धक्कादायक खुलासे करत आहेत.

अशातच या शोमध्ये होस्ट म्हणून काम करणाऱ्या आदित्य नारायण याने एक वक्तव्य केले होते.  हम क्या अलिबाग से आये है क्या? असं आदित्य नारायणने म्हटल होतं. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनसे नेते महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यावरून चांगलेच संतापले  आहेत. खोपकर यांनी होस्ट आदित्य नारायणला फेसबूक लाईव्हमधून झापले आहे. अलिबागकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आदित्य नारायणने माफी मागावी. अन्यथा कानाखाली वाजवावीच लागेल. असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अमेय खोपकर म्हणाले, काल एका हिंदी शोमध्ये होस्ट आदित्य नारायणने  रागपट्टी ठीक से करो हम क्या अलिबाग से आये है क्या असं वक्तव्य केलं आहे. मला असं वाटतय याचा निषेध झाला पाहिजे. आजकाल हिंदी चॅनेलवर अलिबाग बद्दल वक्तव्य केलं जात आहे.

यांना अलिबागची संस्कृती आणि अलिबागची लोकं माहिती नाहीत. उद्या अलिबागकरांच डोकं फिरलं तर हिंदीतली एकही गोष्ट अलिबागमध्ये जाऊ देणार नाही. हा अलिबागकरांचा अपमान आहे. आम्ही याचा निषेध करतो.

माझं उदित नारायणशी बोलणं झालं आहे. त्यांना माझ्या भाषेत मी सांगितलं आहे. तुमच्या पोराच्या अनेक आगाऊपणाच्या तक्रारी येत आहेत. माझ्या अलिबागचा अपमान मी मनसे सहन अजिबात करणार नाही. मी सोनी टीव्हीला कडक शब्दात सांगितलं आहे.

तुम्हाला तुमच्या पुढच्या भागात अलिबागकरांची माफी मागावी लागेल. आम्ही पत्रकचं काढणार आहोत आता हिंदी चॅनेलवाल्यांसाठी. मला यापुढे हे वाक्य ऐकू आलं तर आता पत्र नाय काढणार, विनंती नाय करणार, फेसबूक लाईव्ह नाय करणार, थेट कानाखाली आवाजच काढणार आहे.

आपन अलिबागकर चिडलेले आहात. ही वेळ शुटींग बंद करण्याची नाही. कोरोनाचा काळ आहे. पण त्यांना माफी नक्की मागावी लावणार. माझ्या परीने जे करायचं ते करत राहिलं. अलिबाग असो की महाराष्ट्रातील कुठल्याही शहराचा गावचा जिल्ह्याचा अपमान मनसे सहन करणार नाही.

मनसे अलिबाग करांच्या सदैव पाठिशी आहे. परत एकदा सांगतो आदित्य नारायणला मी अलिबागकरांची माफी मागायला नक्की लावणार. असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे..

महत्वाच्या बातम्या
चिंता वाढली! ब्लॅक फंगसपेक्षा धोकादायक असलेल्या येलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला
कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात उद्धव ठाकरे नंबर वन! जाणून घ्या कोणाचा कितवा नंबर
नही बताती दाम है, हमे तो चूसना आम है! पहिलीच्या या कवितेमुळे सोशल मिडीयावर वाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.