Share

‘राऊतांमुळे ठाण्यात एकच नगरसेवक राहिला, सौ दाऊद, एक राऊत’; मनसेची खोचक टीका

raj thakre & sanjay raut

ठाण्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे एकच नगरसेवक राहिला आहे. यावरून मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावला आहे.(mns leader gajanan kale tweet about sanjay raut )

मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा उल्लेख ‘चमत्कार बाबा’ असा केला आहे. संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यातील महानगरपालिकेत एकच नगरसेवक उरला आहे. या नगरसेवकाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महापौर करतील, असा खोचक टोला मनसे नेते गजानन काळे यांनी लगावला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मनसे नेते गजानन काळे यांनी लिहिले की, “‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला बहुतेक महापौर करणार आता पक्षप्रमुख …सौ दाऊद, एक राऊत”, असे ट्विट मनसे नेते गजानन काळे यांनी केले आहे.

https://twitter.com/GajananKaleMNS/status/1544945423688810497?s=20&t=IfsmirS6fnCWiFlAc9wMkw

या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेतील अनेक महत्वाचे नेते आणि आमदार शिंदे गटात सामील होत आहे. काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार संतोष बांगर देखील शिंदे गटात सामील झाले होते. आता ठाणे महानगर पालिकेतील ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यामध्ये ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांचा देखील समावेश आहे. ठाण्यातील या ६६ नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर या ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शिवसेनेकडे म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे एकच नगरसेवक राहिला आहे.

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची पत्नी नंदिनी विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे नंदिनी विचारे शिवसेनेतच राहणार आहेत. नागपूरमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागपूरमधील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
नाद नाय करायचा! मुंबईच्या पावसात घोड्यावरून करत होता डिलिव्हरी, व्हिडिओ व्हायरल
अखेर मुख्यमंडळाचा विस्तार ठरला, महत्वाची खाती भाजपला तर शिंदे गटाला मिळणार ‘ही’ खाती
‘विश्रांती घेतल्याने कोणीही फॉर्ममध्ये येत नाही’, दिग्गज क्रिकेटर विराट-रोहितवर संतापला

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now