Share

पोलिसांकडून मनसे नेत्याचे अटकसत्र सुरु, मुंबईतून ‘या’ बड्या नेत्याला अटक

raj thackeray

मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. यामध्ये महेंद्र भानुशाली या पहिल्या मनसे नेत्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान महेंद्र भानुशाली यांच्याजवळ असणारे काही भोंगे देखील आहेत. राज ठाकरे यांनी आवाहन केल्यानांतर महेंद्र भानुशाली(Mahendra Bhanushali) यांनी सर्वात आधी हनुमान चालिसा लावली होती. त्यानंतर महेंद्र भानुशाली यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता.(MNS leader arrested by police)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये सभा झाली होती. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं होतं. ४ तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती.

उद्या मनसे पक्षाकडून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही नोटीस देण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कलम १४९ अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्यास आणि सार्वजनिक मालमतेचे नुकसान केल्यास कारवाई करण्यात येते. तसेच सार्वजनिक मालमतेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई देखील घेण्यात येते.

उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळपासून मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते महेंद्र भानुशाली यांना मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून काही भोंगे देखील जप्त करण्यात आले आहे.

यासंदर्भात मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज सिटी पोलीस चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अटींचा भंग आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now