योगी आदित्यनाथ ‘ठग’! उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यावरून मनसे आक्रमक..

मुंबई | उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबईत आहेत. आम्ही वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवत आहोत, मुंबईतून घेऊन जात नाहीत. यासाठी काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलणी झाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

याच पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. आज मुंबईत योगी आदित्यनाथ ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. याच हॉटेलच्या खाली मनसेचे घाटकोपर येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा “ठग” म्हटले आहे.

याचबरोबर उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचे आहे. त्यांच्या याच भूमिकेला मनसेने होर्डिंगच्या माध्यामातून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली.., कुठे महाराष्ट्राचं वैभव…तर कुठे युपीचं दारिद्र. भारतरत्नं दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं.’ ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग” असे मजकूर असलेले होर्डिंग योगी आदित्यनाथ थांबलेल्या हॉटेलच्या परिसरात लावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळ फासू; शिवसेनेच्या वाघिणीने दिला इशारा
मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का?
योगीजी! …मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.