Kishori Pednekar : शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, किशोरी पेडणेकर नाराज? थेट उद्धव ठाकरेंकडे केली तक्रार

Kishori Pednekar : महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही एखाद्या पोटनिवडणुकीची एवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची होत आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकणे दोन्ही गटासाठी गरजेचे आहे.

या निवडणुकी आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले. त्यामुळे दोन्ही गटांना वेगवेगळे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर मशाल हे चिन्ह देण्यात आले.

सोबतच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आणि ढाल आणि तलवारीचे चिन्ह देण्यात आले. अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके या मैदानात उतरल्या आहेत. तर शिंदे गट या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पाटिंबा देत आहे.

दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. सोबतच बाकीचे पक्ष पण या दोन गटावर टीका करतंच असतात. आता मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेनच्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शालिनी ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार किशोरी पेडणेकर सध्या नाराज आहेत.

सोबतच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे पण बोले जात आहे. झालं असं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाराष्ट्रात महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. या यात्रेदरम्यान सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांची भाषण मोठ्या प्रमाणात गाजली आहेत.

पण या यात्रेत सहभागी होण्यासाठी किशोरी पेडणेकरांना बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर नाराज होत्या. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अशी माहिती शालिनी ठाकरे यांनी ट्विट करून दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे गटाचा शिल्लक सेना म्हणून उल्लेख केला आहे.

महत्वाच्या बातम्या
Shinde Group : राऊतांच्या कारभाराला कंटाळून ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार? पहा नेमकं काय घडलय
Nagpur : फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरात भाजपला दणका; काॅंग्रेस राष्ट्रवादीने केला सुपडा साफ
Shivsena : सुसाट भाजपला शिवसेनेचा ब्रेक; फडणवीसांचा ‘हा’ खास नेता ठाकरेंच्या दारी, हाती घेणार शिवबंधन
Eknath shinde: राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्या मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण